ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीतील पहिली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह 

३६५ दिवस अन बारा तास भरणारी एकमेव शाळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- ग्रामीण भागातील शाळा म्हटलं कि, सकाळी दहाला भरलेली शाळा सायंकाळी पाच वाजता सुटलेली असते. अनेकदा या वर्गामध्ये शिकवणी न होता मूल इतरत्र फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बहुतेकदा नकारात्मकच असतो. तसेच

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरत जात असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह जिल्हा परिषदेच्या शाळेने शिक्षणाच्या बाबतीत एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

सध्या सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या. पण पालडोह शाळेत मात्र चक्क शाळा सुरु होती. ही आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात येणारी पालडोहची शाळा. आपल्याला प्रश्न पडला असेल की, इतर शाळांसारखीच असणाऱ्या या शाळेचे वैशिष्ट्य काय? ही शाळा वर्षांचे ३६५ दिवस अन बारा तास चालणारी तालुक्यातील एकमेव शाळा तसेच तालुक्यातील पहिली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा होण्याचा मान या शाळेला नुकताच मिळाला आहे. तालुक्याच्या निर्मितीपासून तालुक्यात एकही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नव्हती,१२१ शाळा ह्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत.

या तालुक्यात स्वतःहून काम करण्यास कोणीही तयार नसतात. कारण हा अतिदुर्गम, आदिवासी बहुल भाग व नक्षलग्रस्त तालुका आहे.पण याच तालुक्यात महाराष्ट्रातील ३६५ दिवस चालणारी शाळा म्हणून जिवतीकडे बघितल्या जात. सुरुवातीला जिल्हा परिषद पालडोह ही १ ते ४ ची शाळा होती. २०१५ मध्ये या शाळेला ५ वर्ग जोडण्यात आला.त्यानंतर सलग एक-एक वर्ग जोडत ही शाळा ८ वी पर्यंत झाली.

    काही वर्षांपूर्वी ही शाळा इतर शाळा सारखीच होती. व २००६ ला या शाळेत शिक्षक राजेन्द्र परतेकी हे आले आणि तेव्हापासून त्यांनी शाळेचे चित्रच बदलले आहे. ज्या वेळेस परतेकी सर आले त्यावेळी शाळेचा पट हा २२ होता. त्यांनी मुलांच शैक्षणिक नुकसान होऊ नये व मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून या शाळेला उच्च प्राथमिक शाळा वर्ग जोडले. शाळेचा पट सुद्धा १५० च्या वर चांगला वाढवला.या शाळेत परभणी पासून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. या शाळेला भेट देणारे शिक्षक, विद्यार्थी, वेगवेळ्या संस्था व एनजीओ व जिल्हा परिषद प्रशासन व इतरांनी घेतलेली दखल त्यामुळे या शाळेला आज एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

     या शाळेला माध्यमिक शाळा कसे करता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असताना २०२४- २०२५ मध्ये या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,पालडोह ला ९ वर्ग जोडण्यात आला आहे, त्यामुळे या तालुक्यातील पहिली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा होण्याचा बहुमान पोलडोह शाळेला मिळाला आहे.

    याचे संपूर्ण श्रेय जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, उपशिक्षणाधिकरी निकिता ठाकरे,देशमुख, गटविकास अधिकारी भिंगारदेव, गटशिक्षणाधिकारी आवारी यांचे सहकार्यातून शाळेला हा मान मिळवता आला आहे.

   याच शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता १ ली ते ८ वी सेमी इंग्लिश शाळा होण्याचा पहिला बहुमान सुद्धा याच शाळेला मिळाला आहे.जिवतीत जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंच करण्यासाठी ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद पालडोह ही नेहमी अग्र स्थानी आहे. जिल्हा परिषद,चंद्रपूर ने सुद्धा यात आपला मोठा वाटा उचलला आहे. सोबत शालेय व्यवस्थापन समिती व गावातील समस्त मंडळी यांचे सहकार्य सुद्धा लाभले आहे.इंग्रजी शाळेला मात देणाऱ्या अश्या पालडोह सारख्या शाळा इतरत्र झाल्या, तर इंग्रजी शाळा ओस पडल्या शिवाय राहणार नाहीत. ही शाळा यशस्वी करण्यात शिक्षकांचे अथक परिश्रम व सोबत गावकऱ्यांची त्यांना लाभलेली साथ आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये