ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगावराजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘वृक्ष लागवड’ कार्यक्रम 

विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला करणार विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

    देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी गणेश सावंत यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांसह त्याच्या हस्ते शाळेच्या आवारात असंख्य रोपांची लागवड करण्यात आली.

त्यानंतर त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन याविषयी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले कि आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगात वृक्षांची लागवड करुन त्यांची जोपासना करणे हे निकडीचे झाले आहे. कारण निसर्गाचा समतोल जर राखायचा असेल तर केवळ ‘वृक्ष लागवड’ हाच एकमेव पर्याय आहे. आज निसर्गात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे दुष्परिणाम आपण पाहत आहोत. ग्लोबल वॉर्मिग, अवेळी पाऊस, आणि बदलते ऋतुचक्र जर थांबवायचे असेल तर असंख्य प्रमाणात वृक्ष लागवड करणे हाच एकमेव पर्याय आपल्या कडे उरला आहे. त्यामुळे असलेली झाडे न तोडणे आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा कानमंत्र कृषी अधिकारी गणेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तसेच या कार्यक्रमात शाळेचे सीईओ सुजित गुप्ता, शैक्षणिक प्रमुख डॉ. प्रियांका देशमुख, उप मुख्याध्यापक फैसल उस्मानी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये