ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेगाव (खुर्द) येथे कृषीदुतांनी दिले मृदा परीक्षणावर प्रत्यक्षिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न व महारोगी सेवा समिती संचालित वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यांनी प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. व्हीं. तायडे यांचा मार्गदर्शना खाली ग्रामीण कृषी कार्यानुभवा अंतर्गत दिले मृदा परीक्षणाचे प्रात्यक्षिक. दरम्यान विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षण व त्यापासून होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती सांगितली.

नुसती माहितीचं नव्हे तर प्रत्यक्ष रीत्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रगतशील शेतकरी श्री. दीवकरजी डोंगरे यांचा शेतातील मातीचा नमुना घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व नमुना घेते वेळी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी व कुठल्या गोष्टीं टाळाव्या ते सविस्तर समजाऊन सांगितले.

दरम्यान विद्यार्थ्यांन मध्ये रोहित गलांडे, कुणाल कोहळे, संभव बैद, प्रेम बासेवार, सागर जरे, प्रज्वल चटकी व हर्षल खाटिक यांचा समावेश असून गावकऱ्यांनी अत्यंत जिज्ञासेने मृदा परीक्षनाची माहिती मिळिवली व आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्याचा निश्चय सुद्धा केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये