ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालय तथा क.म. भद्रावती तालुक्यातून प्रथम

पंचायत समिती भद्रावती येथील आयोजीत कार्यक्रमाचे तीन लाख रुपयाचे प्रथम बक्षीस प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्थानिक लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात खाजगी व्यवस्थापन गटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीला तीन लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. पंचायत समिती भद्रावती येथे एका कार्यक्रमात तीन लाख रुपयाचा धनादेश लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समिती भद्रावती चे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश महाकाळकर, शिक्षण विकास अधिकारी कल्पना सिद्धमशेट्टीवार, केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये, केंद्रप्रमुख यश महाले, संजय साळवे, जलील खा सर प्रामुख्याने उपस्थित होते.

याच उपक्रमा अंतर्गत द्वितीय पुरस्कार दोन लाख रुपये श्री. जगन्नाथ बाबा विद्यालय वायगाव, तसेच तृतीय पुरस्कार एक लाख रुपये कर्मवीर विद्यालय गवराळा यांना देण्यात आला.

 जिल्हा परिषद गटातून प्रथम पुरस्कार तीन लाख रुपये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंदनखेडा, , द्वितीय पुरस्कार दोन लाख रुपये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली व तृतीय पुरस्कार एक लाख रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रान तळोधी यांना देण्यात आला.

सदर पुरस्काराची रक्कम धनादेशाद्वारे संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांना देण्यात आली.

याप्रसंगी प्राचार्य दामोदर दोहतरे, मुख्याध्यापक संजय माथनकर अजय बोंडे ,मुख्याध्यापक नवघरे उपस्थित होते. गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ व गटशिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश महाकाळकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार कल्पना सिद्धम शेट्टीवार यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये