ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांचे करीत आहे शोषण : घनशाम डकहा

भारतीय सुदर्शन समाज प्रदेशाध्यक्षाचा बल्लारशाह, वरोरा, चंद्रपूर दौरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भारतीय सुदर्शन समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह, वरोरा, चंद्रपूर येथे भेट दिली, बल्लारशाह येथील सरदार पटेल हिंदी विद्यालयात सुदर्शन समाज व स्वच्छता कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष घनशाम डकहा यांनी प्रशासनावर आरोप केला की 2008 मध्ये शासनाने डॉ.बाबा साहेब आंबेडकर श्रम सफाई योजनेंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायतीमध्ये सफाई कामगारांसाठी जमिनीसह घरे देण्याची योजना राबविली. मात्र आजपर्यंत जिल्ह्यात एकाही स्वच्छता कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही, हे दुर्दैव आहे. सफाई कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याची तरतूद आहे, मात्र चंद्रपूर महापालिका वगळता अन्य विभागाचे प्रशासन त्यांना सुटी न देता काम करायला लावत आहे. शासनाच्या लाड पागे योजनेंतर्गत नोकऱ्यांची तरतूद असतानाही जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. बल्लारशाह, वरोरा, चंद्रपूर येथे सुदर्शन समाजाच्या वॉर्डांचे सौंदर्यकरण केले जात नाही. सुदर्शन समाजातील शेकडो तरुण सुशिक्षित असूनही बेरोजगार आहेत.

बल्लारशाह, वरोरा, चंद्रपूर येथील सुदर्शन समाजचें ठेकेदारासोबत काही महिला व पुरुष साफसफाईचे काम करायचे, मात्र या कामातूनही शेकडो लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले.

 सफाई कर्मचारी कष्टाचे काम करतात, तरीही प्रशासन त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्यावर कारवाई करते. असा आरोप प्रदेशाध्यक्ष घनशाम डकहा यांनी या बैठकीत भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव चंदन नाहरकर, राज्य कार्याध्यक्ष राम अवतार तूर्केल, प्रदेश सरचिटणीस मनोज खोटे, प्रदेश संघटन मंत्री राजेशजी रेवते, श्रीमती रेखा गौतम (महाराष्ट्र महिला अध्यक्षा), दिलीपजी हजारे (चंद्रपूर जिल्हाध्यक्ष), गिरीशजी शुक्ला व सुदर्शन समाज व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

 या बैठकीत लवकरच सुदर्शन समाजाची संमेलन घेऊन समाजात जनजागृती करणार असून, सफाई कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करावा लागला तरी तो करू, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये