ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

          डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे थोर समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, प्रसंगी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

          यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी शाहू, फुले व आंबेडकर हे समता, स्वातंत्रता, बंधुता व सामाजिक न्याय या भावनेचे प्रतीक आहेत तसेच त्यांचे विचार आजच्या काळात घराघरात पोहोचवण्याची नितांत गरज आहे जेणे करून नव्या पिढीमध्ये हे विचार रुजवले जातील अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा. मोहजितसिंह राजपूत, प्रा अश्विनी जाधव, प्रा नारायण बोडखे, प्रा विलास सातपुते, प्रा अरविंद देशमाने, प्रा सचिन सोळंकी, प्रा. विजय पवार, प्रा वैभव देशमुख, प्रा संदीप टेकाळे, प्रा गोपीकिरण काळे, प्रा ग्रिष्मा देहाने, प्रा अनिता सानप, प्रा. शितल ढाकणे, कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये