Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘यंग इंडिया, फिट इंडिया’ चे ध्येय गाठण्याकरीता तरूण तरूणींना ‘योगाभ्यास व शारीरिक व्यायामाची’ सवय अंगवळणी पडावी म्हणून स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.युनिट, एन.एस.एस. युनिट व रोव्हर-रेंजर पथकाच्या वतीने 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योगा दिना’निमित्त योगाभ्यास करण्यात आला.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले उपस्थित होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष मोहधरे यांनी योगाभ्यास करवून घेतला. कार्यक्रमाचे आयोजन तथा सूत्र संचालन एन.सी.सी. अधिकारी तथा रासेयो कार्यक्रम समन्वयक कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर यांनी केले. यावेळी 78 एन.सी.सी.छात्र सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व रोव्हर्स-रेंजर्स चा समावेश होता. कार्यक्रमाचे आभार खेळ विभागाचे प्रा. धनराज मुंगल यांनी केले.

यशस्वीतेकरीता सार्जंट आदित्य तामगाडगे, प्रशिल अंदुरकर, मनोज नेहारे, श्रद्धा मडावी, पायल चौके, सुजल पराते, साक्षी येळणे, अंजली कामडी व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये