ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे पतंजलि योग समितीच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व पतंजलि योग समिती च्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवस डाॅ. बाबासाहेब महाविद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी कामन प्रोटोकोल मार्गदर्शन करतांना भगवान पालकर यांनी योग फक्त एक व्यायाम नसुन स्वत: सोबत एकत्व चा भाव शोधने असुन योगामुळेच आपल्यात निर्माण होणारया वृत्तीवर रोख लावण्यात येवु शकतो..योग ही एक जिवन जगण्याची जीवनशैली आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास उपस्थित प्रा. डाॅ.स्निग्धा कांबळे यांना डाॅ. रामेश्वर राखडे यांनी सन्मानित केले.

प्रात्यक्षिक व योग नृत्य यशस्वी ऊरकुडे, श्वेता तोंडरे, दृष्टि नाकतोडे यांनी करुन दाखविले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रा. डाॅ. स्निग्धा कांबळे, भगवान पालकर , प्रा. बुरखुंडे सर, यशवंत तलमले, डाॅ. रामेश्वरजी राखडे, डाॅ.लोकेश मुळे, सुबोधदादा, डाॅ. नवलाजी मुळे, सु.श्री. रेखाताई, तुळशीरामजी सपाटे, डॉक्टर नरेश बावननकुळे, मारोती कार, तुळशीराम येरने समस्त पतंजलि योग समिती पदाधिकारी व योग शिक्षक, प्राध्यापक वृंद यांची कार्यक्रमास प्रमुख.उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तुळशीरामजी सपाटे, आभार लेफ्टनंट सरोज सिंगाडे यांनी केले.

ब्रम्हपुरी येथे पतंजलि योग समितीचे माध्यमाने स्टेम पोददार लर्न स्कूल, लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये