चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या सुलेझरी बस स्थानक परिसरात भिकेस्वार येथील विनायक वासुदेव वरंबे वय ४८ वर्ष हा नाग भीड येथे बाजार करण्यासाठी पायदळ येत असताना नागपूर- गडचिरोली बस क्रमांक एम एच ४० बी एल ४०५८ ही नागपूर येथे जात असताना सुलेझारी बस क्रमांक येथे चालक सूरज बळवंत गेडाम ह्याला अपघात झाल्याने ताब्यात घेतले.
अपघात ग्रस्त विनायक वरंबे याला ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून डॉक्टर यांनी मृत घोषित करण्यात आले यामुळे चालक सूरज गेडाम यांचेवर फ आय आर,२०८/२४ अन्वये कलम २७९/३०४(अ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार राठोड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक करीत असल्याचे समजते. बस ताब्यात घेतली तर चालकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.



