ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारू, बियर व दोन मोटर सायकलसह 2,15,850/-रु चा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  दिनांक. 18/06/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन पो. स्टे. वर्धा शहर हद्दीत अवैद्य धंदयावर कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून यातील आरोपी 1) कपिल दीपक वासनिक वय 36 वर्ष रा.नागसेन नगर,वर्धा 2) प्रशील बंडू गेडाम वय 21 वर्ष नागसेन नगर नालवाडी वर्धा यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता दोन्ही आरोपीचे ताब्यातून विदेशी दारू, बियर व दोन मोटर सायकल व एक सॅमसंग कंपनीचा फ्रिज असा एकूण जू.किं.2,15,850/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपी विरुद्ध पो. स्टे. वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. स्टे. वर्धा शहर येथील अंमलदार करीत आहे.

       सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, महादेव सानप, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, रामकिसन ईप्पर, मनीष कांबळे, अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा* यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये