ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहरात अवैध दारु बाळगुण विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १०/०६/२०२४ रोजी वर्धा शहरातील आदिवासी कॉलनी येथे दोन इसम अवैध दारु बाळगुण तिची विक्री करीत असल्याची मुखबीर कडून खात्रीशीर माहिती मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे विशेष पथकास मिळाल्यावरुन विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस स्टेशन रामनगर येथील पोलीस स्टॉफसह मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहीतीप्रमाणे यातील आरोपी क्र. १) शाहरुख पठाण, वय ३४ वर्ष, २) शुभम दारोकर, वय ३२ वर्ष, दोन्ही रा. आदिवासी कॉलनी, वर्धा यांचेवर दारुबंदी कायद्यान्वये रेड केला असता आरोपीतांचे घरझडतीत १) 500 एम.एल. च्या टुबर्ग कंपनीच्या बियरच्या ४२ कॅन कि. २१,००० रु., २) ६५० एम.एल. च्या टुबर्ग कंपनीच्या बियरच्या २५ शिश्या कि. ८७५० रु. ३) १८० एम.एल. च्या रॉयल स्टेंग कपंनीच्या विदेशी दारुच्या २९ शिश्या कि. ८७०० रु., ४) १८० एम.एल. च्या रॉयल ग्रीन कंपनीच्या विदेशी दारुच्या १३ शिश्या कि. ३९०० रु. ५) १८० एम.एल.च्या रॉयल चॅलेंज कंपनीच्या विदेशी दारुच्या २० शिश्या कि. ६००० रु., ६) १८० एम.एल. च्या ओ.सी. ब्ल्यु कंपनीच्या विदेशी दारुच्या १२ शिश्या कि. ३००० रु., ७) १८० एम.एल. च्या आयकोनीक व्हॉईंट कंपनीच्या विदेशी दारुच्या २६ शिश्या कि. ८१०० रु., ८) एक गोदरेज कंपनीचा रेफ्रीजरेटर कि. ७००० रु. असा एकुण ६६,४५० रु. चा माल मिळुन आल्याने जप्त करुन यातील आरोपीतांवर पोलीस स्टेशन रामनगर येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि. मंगेश भोयर, पोलीस स्टेशन रामनगर येथील सपोनि. जोशी, पोलीस अंमलदार निलेश कट्टोजवार, रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलीस स्टेशन रामनगर येथील पोलीस स्टॉफ यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये