वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही
ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७ लाख ९ हजाराचा माल जप्त.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ११/०६/२०२४ रोजी मुखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील आजंती पाट येथे अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्यावर रेड केला असता १) एक नवीन लाल रंगाचा महिंद्रा ५७५ DI SP PLUS कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-३२/AH-८४९६ किंमत ६,00,000/- व एक लाल रंगाची राज कंपनीची ट्रॉली क्रमांक MH-३२/TC-०२६ किंमत १,00,000/- व ट्रॉली मध्ये ब्रास रेती किंमत ९०००/-१ असे मिळून आल्याने आरोपी १) मालक अंकित अशोकराव टेकाडे, वय २८ वर्ष रा. बॉर्ड क्र. १ बकाने ले-आऊट, देवळी, २) चालक प्रकाश पुरुषोत्तम भिडिकर, वय ४७ वर्ष, रा. वॉर्ड क्र. १६ इंदिरानगर, देवळी यांचे विरुध्द पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे बांचे मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि, मंगेश भोयर, विशेष पथकातील पोलीस अंमलवार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालवे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेब पोलीस स्टेशन देवळी येथील पोलीस स्टीफ यांनी केली.