गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही

चारचाकी वाहनासह एकूण १२ लाख ९७ हजारांवर देशी-विदेशी दारूसाठा जप्त.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ११/०६/२०२४ रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे देवळी येत असल्याची मुखबीर कडून खात्रीशीर माहिती मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे विशेष पथकास मिळाल्यावरुन विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळी येथील राम मंदिर जवळ सापळा रचून नाकेबंदी केली असता एक Walkswagan Vento Sedan चारचाकी वाहन क्र. MH-०२/BT-५२४९ हे मिळुन आल्याने सदर वाहनाची झडती घेतली त्यामध्ये १) एकूण १९ खाकी खोक्यामधे १८० ml चे ओ सी ब्ल्यू कंपनीचे व्हिस्की ने भरलेले ९१२ बॉटल्स प्रती किंमत ३००/- प्रमाणे किंमत २,७३,६००/१, १) दोन खाकी खोख्यामधे १८० ml चे ऑफिसर चॉईस कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या ९६ बॉटल्स किंमत २४,०००/-₹, चा विदेशी दारूसाठा मिळुन आला असता वाहन चालक १) नामे चालक- मंगेश प्रकाश पाटमाशी वय 30 वर्षे रा. इंदिरा नगर वार्ड नं. १७ देवळी यास ताब्यात घेवुन त्यास विचारपूस केली असता तो त्याचा मालक २) गजानन पाटणकर वय ४० वर्षे, ३) विक्की पाटणकर वय 39 वर्षे दोन्हीं रा. देवळी यांचे करीता काम करीत असल्याचे सांगितले व सदरचा दारुसाठा हा त्याने अंकित जयस्वाल, रा. वर्धा याचे ग्राम विटाळा, जि. अमरावतील येथिल बार मधुन आणल्याचे सांगितले. वरील वाहनात मिळुन आलेला १) एकूण १९ खाकी खोक्या मधे १८० ml चे ओ सी ब्ल्यू कंपनीचे व्हिस्की ने भरलेले ९१२ बॉटल्स प्रती किंमत ३००/- प्रमाणे किंमत २,७३,६००/-५, २) दोन खाकी खोख्या मधे १८०ml चे ऑफिसर चॉईस कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या ९६ बॉटल्स किंमत २४,०००/-₹, ३) एक Walkswagan Vento Sedan car क्रमांक MH-०२/BT-५२४९ किंमत १०,००,०००/-₹ असा एकुण १२,९७,६०० रु. चा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक, मालक व बार मालकाविरुध्द पोलीस स्टेशन देवळी येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि, मंगेश भोयर, विशेष पथकातील पोलीस अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलीस स्टेशन देवळी येथील पोलीस स्टॉफ यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये