महिलांची प्रगती, सुरक्षा व सन्मान हीच देवाभाऊंची खरी बांधिलकी – भोंगळे
कोरपना महिला मोर्चाकडून देवाभाऊ-रक्षाबंधन सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
आपले सरकार हे जनतेला समर्पित असून जनकल्याणासाठी कटिबद्ध आहे. राज्यातील महिलांची प्रगती, सुरक्षा व सन्मान हीच देवाभाऊंची खरी बांधिलकी आहे. त्यामुळे महिलाभगीनींनी आपल्या स्वप्नांना पंख द्यावे; तुमचा लाडका देवाभाऊ पुर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठीशी आहे. असा आशावाद आमदार देवराव भोंगळे यांनी वक्त केला.
भारतीय जनता महिला मोर्चा कोरपना च्या वतीने काल (दि. १९) आयोजित केलेल्या आपला देवाभाऊ-रक्षाबंधन सोहळ्यात लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना ते बोलत होते.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याकरता आपला देवाभाऊ-रक्षाबंधन हा राज्यव्यापी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर कोरपना तालुक्यातील भाजप महिला मोर्चाकडून आमदार देवराव भोंगळे यांना राखी बांधून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपली राखी पाठविण्यात आली.
याप्रसंगी आपल्या मनोगतात आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, आपल्या सर्वांचा देवाभाऊ समस्त महिलाभगीनींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आपल्या महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी विविध क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, एसटी प्रवासात अर्धे प्रवासभाडे, महिला बचत गटांना कर्ज, लखपती दिदी यांसारख्या अभिनव व दुरागामी योजनांमुळे आज महिलांची आर्थीक भरभराट होत आहे. त्या स्वावलंबी होऊन पुढे येत आहेत.
पुढे बोलताना, आपण जी रेशमी धाग्याची पवित्र राखी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा. देवाभाऊंना पाठवित आहात ती राखी केवळ धागा नसुन या राज्याच्या सेवेसाठी आदरणीय देवेंद्रजींचे मनगट मजबूत करणारा विश्वास आहे. आणि तुमच्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेऊ असा शब्द देतो. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला मंचावर सौ. अर्चना भोंगळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, अरूण मडावी, शहराध्यक्ष अमोल आसेकर, विशाल गज्जलवार, महिला मोर्चाच्या महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, तालुकाध्यक्ष जोत्सना वैरागडे, शहराध्यक्ष अल्का रणदिवे, पुरुषोत्तम भोंगळे, आशिष ताजने, ओम पवार, शशिकांत आडकिने, किशोर बावणे, जगदीश पिंपळकर, मनोज तुमराम, सचिन कुळमेथे, तिरुपती किन्नाके, सत्यवान घोटेकर, कार्तिक गोण्लावार, दिनेश खडसे, नगरसेविका वर्षा लांडगे, सविता तुमराम, अविनाश वाभीटकर, उमेश पालीवाल, अमोल बाविस्कर, विजय पानघाटे, सरिता चिंतलवार, अनु ताजणे, गीता डोहे, आशा झाडे, जया धारणकर, संगीता चिंतलवार, जयश्री मेश्राम, सोनाली आसेकर, हर्षा इटणकर, सुरेखा बुटले, मिलिंद पाटील, नितेश मडावी, दिनेश ढेंगळे, विनय मालेकर, धम्मकिर्ती कापसे, निखिल खडसे, अनिकेत मालेकर,आशिष देवतळे, शैलेश परसुटकर, शांताराम देरकर, अजय तिखट, प्रकाश भुयार, सुदाम लांडे, संजय चौधरी, सचिन भोयर, अभिजीत कोंडावार आदींसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.