ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या लेझीम पथकाने केली धमाल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रुम्हणा द्वारा संचलित देऊळगावमही येथिल स्वामी विवेकानंद विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,शाळेच्या मुख्य प्रांगणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुराव नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी संविधानाचे वाचन व तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली तर *गरजा महाराष्ट्र माझा* या गिताचे ध्वनी क्षेपनाद्वरे वाचन करण्यात आले ,याच विद्यालयातील विद्यार्थिनींनी लेझीम पथक सादर केले , पारंपारिक वेशभूषेत या विद्यार्थ्यांनीनी जोरदार प्रदर्शन करत देऊळगाव मही वासीयांची मने जिंकून घेतली, त्यानंतर ग्रामपंचायत समोर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात याच विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी माऊली माऊली विठूरायाची माऊली या धार्मिक गीतावर सुंदर नृत्य सादर केले.

सर्व सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले, यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर गायकवाड, सहाय्यक शिक्षक गजानन नागरे, देवानंद डोईफोडे, विजय खरात, गणेश दराडे, राजकुमार नागरे, सुधाकर गीते, अविनाश कायंदे, प्रतिभा शिंगणे, रोहिणी पेठकर, प्राध्यापक गजानन मुंडे, राजू जाधव, योगेश शिंगणे, भारतीय जनता पक्षाचे कैलास राऊत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये