ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साथ फाऊंडेशनच्या दही हंडी स्पर्धेत 1 लाखाच्या पुरस्कारावर चंद्रपूर च्या गोविंदा पथकांनी मारली बाजी

दुसऱ्या क्रमांकावर भंडाराचा पथक ; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,गायिका इशरत जहाँ,लावण्यावती आस्था वांद्रे यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

साथ फाउंडेशन व रोहितभाऊ बोम्मावार मित्र परिवाराचे आयोजन

सावली शहरात प्रथमच साथ फाउंडेशन व रोहितभाऊ बोम्मावार मित्रपरिवार सावली च्या वतीने गोकुळाष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम 1 लाख रुपये व ट्राफी हा पुरस्कार जय शितला माता गोविंदा पथक चंद्रपूर यांनी पटकाविला तर दुसऱ्या क्रमांक 51 हजार व ट्राफी वर भंडारा येथील जय श्री महाकाल गोविंदा पथकांनी बाजी मारली.आणि या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला.

 दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोज मंगळवार ला सायंकाळी पाच वाजेपासून सावलीतील पंचायत समिती समोरील पटांगणावर या दहीहंडी स्पर्धेचे भव्य आयोजन केले होते.

या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीकुमार भांगडीया यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे होते तर प्रमुख उपस्थिती

प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ,मुबंई येथील प्रसिद्ध गायिका इशरत जहाँ, प्रसिद्ध लावण्यावती आस्था वांड्रे,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे,रोहित बोम्मावार,जयंत टेमुर्डे,गणेश तर्वेकर,नंदाताई अल्लुरवार,आवेश खा पठाण,निशिकांत बोरकर,राजू बोरकर,हेमंत लांजेवार,सावली चे नगरसेवक विजय मुत्यालवार, सतीश बोम्मावार, नीलम सुरमवार, लताताई लाकडे,शारदा गुरुनुले,पल्लवी ताटकोंडावार,सचिन संगीळवार,अंतबोध बोरकर,गुणवंत सुरमवार, कांग्रेस जेष्ठ नेते प्रकाश राईचंवार,भाजप जेष्ठ नेते प्रकाश गड्डमवार, देवराव मुद्दमवार,संतोष तंगडपल्लीवार,भाजप तालुका अध्यक्ष किशोर वाकुळकर,अतुल कोपुलवार,सौ.रुपाली बोम्मावार यांच्या इतर गणमान्य उपस्थित होते

या कार्यक्रमाला झालेली प्रचंड गर्दीने मी भारावलो आहे.आत्ताच रोहित बोम्मावार हे मध्यवर्ती बँकेवर प्रचंड मतांनी विजयी झाले त्याची विजयी सभा आहे असेच चित्र या ठिकाणी दिसत असून जनसेवेचे व्रत हाथी घेतलेल्या साथ फाऊंडेशन चे अध्यक्ष रोहित बोम्मावार ला आमची साथ ही सदैव राहील असे असे म्हणत उत्तम आयोजनाचे कौतुक केले.

आमदार बंटी भांगडीया म्हणाले की, सावली ही जगाची माऊली आहे आणि ती सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राचे पंढरी आहे.या सावली चा आर्शिवाद मला ही 2012 पासून लाभला आता तो पुढील भविष्याच्या वाटचाली साठी रोहित बोम्मावार यांच्या मागे असाच राहू द्या.आपण जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा तेव्हा मी आपल्या सोबत असेल फक्त आपली साथ सोबत ठेवा असे उदघाटन प्रसंगी म्हटले.

अध्यक्षस्थानाहून बोलतांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाची एकहाती सत्ता आलेली आहे.शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली बँक या पुढे यशाच्या घोडदौड मध्ये पुढे असेल आपण सहकार ची जाण असलेला आमचा लहान भाऊ रोहित बोम्मावार ला माझ्या सोबतीला मध्यवर्ती बँकेत दिला त्याबद्दल आभार मानत या कार्यक्रमाने मी भारावून गेलो असे म्हणत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेकरिता प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही उपस्थित होती.आपल्या सुंदर भाषणाने व मराठी डॉयलॉग व दिलचेखक नृत्याने प्रेक्षकांना भुरड पाडले तर तर मुबंई येथील प्रसिद्ध गायिका इशरत जहाँ यांच्या एका पेक्षा एक बहारदार गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तर प्रसिद्ध लावण्यावती आस्था वांड्रे यांची डुकमदार लावण्याचा प्रेक्षकांनी आनंद लुटला व वातावरण बदलवून टाकले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा साथ फाऊंडेशन चे अध्यक्ष रोहित बोम्मावार यांनी केले यावेळी त्यांनी साथ फाऊंडेशन च्या माध्यमातून भविष्यात होणाऱ्या कार्याची माहिती दिली.आणि आज जशी सर्वांची साथ लाभली तशी नेहमीच आपली साथ असू द्या असे म्हटले यावर जनतेनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे संचालक सुरज बोम्मावार यांच्या सोबत एम जे आकाश व कु. अंकिता हिने केले.तर आभार साथ फाउंडेशन चे सचिव डॉ.रुपाली बोम्मावार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साथ फाउंडेशन व रोहितभाऊ बोम्मावार मित्रपरिवार च्या सर्व संचालकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये