देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची वार्षिक आमसभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ची वार्षिक आमसभा 14 ऑगस्ट रोजी विरंगुळा भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
आमसभेच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे मानद संचालक गोविंदराव अहिरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फेस्कॉम मुंबई चे अतिरित्त मुख्य सचिव डॉ प्रकाश पिंपरकर, प्रादेशिक अध्यक्ष अशोक खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील, मानद संचालक प्रा प्रदीप मिनासे, तालुका अध्यक्ष बळीराम मापारी, होते.
डॉ प्रकाश पिंपरकर यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन समस्या सोडविण्याचे आवाहन केले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपली मालमत्ता कुणाच्याही नावे करू नये, असा सल्ला दिला.
यावेळी उपस्थित अतिथींनी सुद्धा मार्गदर्शन केले, याशिवाय सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे,रमेश नरोडे, प्रा अशोक डोईफोडे,प्रा विनायक कुळकर्णी, दंदाले, बाहेती यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक संघटनेचे सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले संचालन स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष काशिनाथ खांडेभराड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश अहिरे यांनी केले. याप्रसंगी विरंगुळा भवन परिसरात वटवृक्ष ची लागवड करण्यात आली. आमसभेला सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.