ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टाकावू वस्तूपासून स्वप्नील मेश्राम देतोय चिमण्यांना चारा – पाणी

उन्हाच्या झळा चिमण्यांनाही बसत असल्याने उपक्रम

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर हे जगात सर्वात उष्ण शहर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चंद्रपूर तापमानाचे उच्चांक गाठत आहे. माणसांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. माणसांना उन्हाची झळ पोहोचत आहे. अशातच मुक्या प्राण्याला – पक्ष्यांना देखील ते सोसावं लागत आहे. उन्हात अन्नाचा शोध घेत दूर वर जातात.

परंतु आपल्या अंगणात नेहमी दिसणाऱ्या चिमण्या आजकाल दिसत नाही. या चिमण्या पुन्हा आपल्या अंगणात दिसाव्यात आणि त्यांची भूक भागवावी या उद्देशाने नुकतेच समाजकार्याचे शिक्षण पुर्ण केलेला स्वप्नील याने दोन टाकावू प्लास्टिक बॉटल आणि घरगुती वस्तूंचा उपयोग करुन चिमण्यांसाठी अन्न व पाणी उपलब्ध करुन दिले.

टाकावू वस्तूपासून त्याने ही निर्मिती केलीय. चिमण्या आपल्या चोचीने एका वाटीतले गहू खात असते तर एका वाटीने पाणी पीत असते. यामुळे चिमण्या रोज आपली तहान – भूक भगविताना दिसत असल्याचे स्वप्नील सांगतोय. स्वप्नील ने नुकतेच सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथे समजकार्याचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच युवा साहित्यीक आहे. अनेक विषयांवर लेख, कविता विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाले असून विविध पुरस्काराने तो सन्मानित आहे. महत्वाचे म्हणजे लवकरच ‘सजग फाऊंडेशन’ संस्था ही NGO स्थापन करुन त्या माध्यमातून टाकावू वस्तू पासुन टिकावू वस्तू निर्मिती तसेच पर्यावरण, आरोग्य आणि इतर विषयांवर कार्य करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने त्याने आपले प्रयत्न देखील सुरु केले आहे.

उन्हाळ्यात भर उन्हात चिमण्यांना भटकावे लागू नये म्हणुन चिमण्यांना तो चारा पाणी देतोय. या छोट्याशा कार्याचे त्याने आनंद व्यक्त केलाय व सर्व नागरिकांनी आपल्या घरी पक्षांसाठी चारा पाणी उपलब्ध करुन द्यावे असे आवाहन देखील स्वप्नील करतोय.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये