डाँ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याला तेलंगाना – महाराष्ट्र सीमावर्ती भागातील जनसमुदाय एकत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
तेलंगणातील कुमराम भीम (आदिफाबाद) जिल्ह्यातील मौजा कोनेरू कॉलोनी येथे माजी आमदार कोनेरू कोणाप्पा यांचे सहकार्यातून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा बसविण्याचे काम करण्यात आले. कोनेरू कॉलोनी हे छोटंसं गाव असून या गावात फक्त १९ घरांची बौद्धाची वस्ती आहे. लोणवेली तेलंगणा येथील प्रतिष्ठित नागरिक माधव दुर्गे आणि महाराष्ट्रातील शालिक माऊलीकर सेवानिवृत्त अधिकारी यांच्या पुढाकाराने ५ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ तेलंगणा व महाराष्ट्रातील असंख्य जनसमुदायाच्या साक्षीने थाटामाटात संपन्न झाला. या निमित्ताने चंद्रपूर सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय द्वारा कोनेरू कॉलोनी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन शालिक माऊलीकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माधव दुर्गे होते. डाँ. संदीप पिपरे जिल्हा दंत शल्यचिकित्स्क आणि त्यांच्या चमूने रुग्ण तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
याच दिवशी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सिरपूर कागझनगर निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार कोनेरू कोणाप्पा यांचे शुभ हस्ते व राजुराचे माजी आमदार वामनराव चटप यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्ष स्थानी ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट पेंशनर्स फेडरेशनचे (AISGPF) राष्ट्रीय उपाध्यक्ष शालिक माऊलीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश मेश्राम उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, मोरेश्वर सुरकर अध्यक्ष ओ.बी.सि. कृती समिती, शंकर पाल, सुनील फलके, भारत चंद्रागडे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, डाँ. प्रकाश तोहगावकर, संदेश निमगडे, मोरेश्वर दुर्गे, प्रा. अलोक खोब्रागडे, झावरू उराडे, तोषविनाथ झाडें, ऍड. अक्षय उराडे, रामकृष्ण सांगडे अध्यक्ष शेतकरी संघटना, संदीप रायपूरे, भस्की सर, दुशलता माऊलीकर मुख्यध्यापिका, दर्शना दुर्गे महिला अध्यक्षा भा.बौ.म.स. यांची उपस्थिती होती. स्वागताध्यक्ष म्हणून माधव दुर्गे होते.
प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून चंद्रपूर जिल्हा माळी समाज संघटनेचे जिल्हा संघटक बळीराज निकोडे उपस्थित होते. त्यांनी अत्यंत मार्मिकपणे तरुणांच्या मनाला भिडणारे प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ऍड. सचिन फुलझेले यांनी केले तर आभार जनार्धन यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदायाच्या मनोरंजनाकरिता रात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बौद्ध अनुयायांनी अथक परिश्रम घेतले.



