ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रक्तदानाच्या माध्यमातून जीव दानाचे कार्य भद्रावतीतील प्रेरणादायी उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

येथे नुकताच ओकिनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर भद्रावती व श्री हनुमान जन्मोत्सव समिती भद्रावती तथा रक्त संक्रमण विभाग महाराष्ट्र शासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर परिसर डॉ शिंदे हॉस्पिटल मेन रोड भद्रावती येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले

यात सर्व प्रथम स्वर्गीय सेंसाई – मास्टर प्रकाश कोवे / स्वर्गीय सेंफाई मास्टर मुन्ना शर्मा / स्वर्गीय रविकांत कावटी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रार्थना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

प्रमुख पाहुणे म्हणून सेंसाई मास्टर मनीष सारडा. सेंफाई मास्टर सतीश वनकर. सेंफाई मास्टर अनिल मोडक. सेंफाई मास्टर पवन हूरकट. सेंफाई मास्टर रत्नाकर साठे. सेंफाई मास्टर राजू गैनवार माजी नगरसेवक. सेंफाई मास्टर विनोद वानखेडे माजी नगरसेवक. इत्यादी मान्यवर उपस्थित होते

दिवंसेदिवस वाढणारे अपघात किंव्हा अन्य आजार असणाऱ्या किंव्हा विविध शस्त्रक्रियाकरिता अनेकदा रक्ताची गरज भासते ही समस्या लक्षात घेता या समस्येवर मार्ग काढत भद्रावती येथील युवकांचा ग्रुप गरजूनच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो रक्तदान करून जीवनदानाचे महान कार्य करीत हे युवक सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवीत आहेत रक्तदान हे श्रेष्ठ दान

विशेष म्हणजे या रक्तदाना मध्ये नऊ महिला युवती आणि पुरुष युवक असे बावन रक्तदात्यानी स्वईचेने रक्तदान केले सर्व रक्त दात्याना प्रशस्ती पत्र देण्यात आले

या कार्यक्रमाचे संचालन ललित कोलते यांनी केले प्रास्ताविक श्रीराम रुयारकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशांत बरडे यांनी मानले

हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता ललित कोलते. श्रीराम रुयारकर. प्रशांत बरडे. विनोद रुयारकर. अनिल डोये. विलास दाते. मोहन कोवे. राजू डाखरे. सुभाष पिदुरकर. शैलेश बंडावार. शीतल बहादे. रितेश वनकर. डॉ नितीन सातभाई. प्रशांत इंगळे. रवींद्र राव. अशापक अली. संतोष लामकासे. निलेश जैन इत्यादींनी अथक परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये