Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साखरी येथील उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना न्याय द्या

साखरी माती उत्खनन कम्पनीतील व्हाल्वो ऑफरेटरची आर्त हाक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सी.एम.पी.एल. पौनी मौजा साखरी येथे व्हाल्वो ऑफरेटर हे मागील सन २०२१ वर्षांपासून माती उत्खननाच्या कामांवर कार्यरत आहेत. नुकतेच सी.एम.पी.एल. ह्या कम्पनीने कार्यरत सर्व व्हाल्वो ऑफरेटर कामगारांना पत्राद्वारे काम संपले असून आता या कम्पनीचे या क्षेत्रात कोणतेही काम नाही. आपण आपापल्या परीने कामाचा मार्ग निवडण्यास सांगितले. त्यामुळे या कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले.

आमच्या माहितीप्रमाणे राजुरा तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सास्ती येथे उपरोक्त कम्पनीचे माती उत्खननाचे काम सुरू आहे. येथील कामगारांना सास्ती येथे हलविल्यास व्हाल्वो ऑफरेटर कामगारांना पुर्ववत काम मिळेल आणि काम बंदमुळे कामगारांवर उपासमारीची पाळी येणार नाही.

सी. एम. पी. एल. कम्पनीच्याच दुसऱ्या साईटवर काम उपलब्ध असताना कामगारांना काम न देणे हा कामगारांवर हेतू पुरस्सर अन्याय असून कामगारासोबतच कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आणणे आहे.

कामगारांवर काम बंदमुळे येणारी उपासमारीची पाळी आणि अन्य गंभीर परिणामांची जाणीव ठेवून काम करणाऱ्या कामगारांना सास्ती येथे स्थानांतरीत करून न्याय मिळवून द्यावे या न्याय मागण्यासाठी येथील कार्यरत कामगारांनी आपली न्याय हक्काची मागणीची हाक शासन दरबारी पोहचविण्यासाठी दिनांक २५ मे २०२४ ला वेळ दुपारी १ : ३५ वाजता स्थळ_ सी. एम. पी. एल. कम्पनीच्या सामोर बेमुदत धरणा आंदोलन सुरू करण्यात आले.

शासनाने व्हाल्वो ऑफरेटर कामगारांच्या न्याय मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी उलट कामगारांवर पोलिसाकरवी बडगा उगारला असून अन्यायग्रस्त कामगार सूरज उपरे, आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, संकेत भादीकर, आशिष पाझरे,प्रशांत वाघे, सुधाकर बोबडे,दशरथ कोंडावार, पांडू मंगम अविनाश मंचलवार, नरेश येल्लारी, श्रीकांत जेल्लोलवार,साई मिगीलवार,राम ईरकुलवार, दयानंद चव्हाण, विठ्ठल कोल्हे,प्रवीण चेनवेनवार, गणेश चीप्पावार,प्रकाश मंगाम,संजू मारमोकमवार, सागर ईसमपल्लीवार,शंकर काळे,राम वरदलवार,संतोष राजनवार, भीमा राजू अद्दुरी,हरीश रैनावेणी,पिंटू चेनवेनवार,राकेश चेनवेनवार,प्रकाश चेनवेनवार,अजय ईग्रपवार,राहुल राठोड,गणेश बोबडे, भूषण भाऊ फुसे सामाजिक कार्यकर्ता,सुभाष हजारे सामाजिक कार्यकर्ता इत्यादी वर गुन्हा दाखल केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये