Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्थानक परिसरात युवकाचा मृतदेह आढळला

भद्रावती येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती येथील बस स्थानक परिसरात एका 39 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर घटना 26 रोज रविवारला सायंकाळी बसस्थानक परिसरात उघडकीस आली. राजू भरणे व 39 वर्ष असे या मृतकाचे नाव असून हा युवक मद्यधुंद अवस्थेत पडून होता. त्यात उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचुन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये