ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील अवैध हातभट्टी दारु विक्रेती महिले विरुध्द एम.पी.डी.ए. कायदयांतर्गत कार्यवाही करुन अमरावती कारागृहात स्थानबध्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, हिंगणघाट, जि. वर्धा अंतर्गत संत तुकडोजी बार्ड हिंगणघाट परीसरात अवैधरित्या हातभट्टीची गावठी मोहा फुला पासून निमीत दारु तसेच देशी दारुची विक्री करणारी अंजना ऊर्फ अंजीबाई राजु येळणे, वय ५२ वर्ष राह. संत तुकडीनी बाई हिंगणघाट ता. हिंगणघाट नि. वर्धा हिचे विरुध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट, जि. वर्धा येथे सन २०१२ ते २०२५ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९, भारतीय दंड संहीता. १८६० अन्वये एकूण ३९ गुन्हे दाखल आहेत. स्थानबध्ध महौले विरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायद्यान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदरहू स्थानबध्द महोला ही न जुमानता अवैधरीत्या गावठी मोहा फुलाच्या हातभट्टीच्या दारुची तसेच देशी दारुची विक्री करीत होती. ज्यामुळे पोलीस स्टेशन, हिंगणघाट तसेच संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथेल परीसरातील सार्वजनीक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच पोलीस स्टेशन, हिंगणघाट परीक्षेत्रात तसेच आजू बाजुचे खेडे गावातील मोठया प्रमाणात मदपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला मुलींना खुप त्रास वाढत चालला होता.

ठाणे प्रभारी अधिकारी पो.नि देवेंद्र ठाकुर, यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराम जैन यांचे मार्फतीने मा. जिल्हा पंडाधिकारी, तमा जिलाधिकारी वर्धा श्रीमती. बान्मधी सी. यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी, तथा जिल्हाधिकारी वर्धा यांनी दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन तिला अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परीषद निवडणुक निर्भीडपणे व शांततेत पार पाडण्या करीता अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुची विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, तथा निल्हाधिकारी वर्धा श्रीमती. बान्मधी सी., तसेच मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहेत. सन २०२४ मध्ये एकूण १९ दारु स्क्रिते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत अशा प्रकारची कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२५ मध्ये आज पावेतो एकुण २७ दारु विक्रते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हयातील अवैध दारू विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार प्रचंड दहशती मध्ये आहेत.

सदर प्रकरणी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक, डॉ. श्री. सागर कयडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. रोशन पंडीत उप विभाग, हिंगणघाट, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोनी/देवेंद्र ठाकुर, पोउनि भारत वर्मा, पो.स्टे. हिहंगणघाट, सफी/गिरीष कोरडे, पोड़वा/अमोल आत्राम, आशिष महेशगौरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पोलीस अर्मलदार प्रविण देशमुख, आशिष मैश्राम, विजय हारनुर पो.स्टे. हिंगणघाट यांचे पथकाने सदरची कार्यवाही केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये