Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती तस्करी सुरूच., महसूल विभागाने ताब्यात घेतले ४ ट्रॅक्टर

चांदा ब्लास्ट

मूल:- रेती वाहतुक परवाना शिल्लक असल्याचे कारण पुढे करून महसूल विभागाने ३० एप़िल पावेतो रेती उपसा करण्यास परवानगी दिली.रेती तस्करांनी हजारो ब़ास रेती उपसा करून घाट रिकामे केलेत. मात्र निर्धावलेल्या रेती चोरांनी ३० एप्रिल नंतरही चोरीचे सत्र सुरूच ठेवल्याचे चित्र महसूल विभागाने उसराळा घाटावरून पकडलेल्या ४ ट्रॅक्टर वरून लक्षात येत असल्याची चर्चा आहे.

 उमा नदीच्या उश्राळा घाटावर संधी साधुन अवैधरित्या रेतीचा उपसा करून गैरमार्गाने विकण्याचा प्रयत्न करत असतांना महसुल विभागाच्या पथकाने चार ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने अवैद्य रेती व्यासायीकांचे धाबे दणाणले आहे.

मूल तालुक्यातील मारोडा- पेटगांव मार्गावरील उश्राळा गावालगत असलेल्या उमानदीच्या घाटावरून मोठया प्रमाणांत रेतीचे उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती महसुल विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रेती उपसा करणा-यांवर आळा घालण्यासाठी नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे यांचे नेतृत्वात भरारी पथक तयार करण्यांत आले. तयार करण्यांत आलेल्या भरारी पथकातील मंडल अधिकारी संजय कानकाटे, दिपक गोहणे, तलाठी शंकर पिदुरकर आणि महेश पेंदोर यांनी आज पहाटे 4 वाजता पासून उश्राळा रेती घाटालगत पाळत ठेवली. पाळतीवर असतांना चार ट्रॅक्टर सदर रेती घाटावर रेतीचा उपसा करण्यासाठी आले.

दरम्यान 8.40 वा. चे दरम्यान भरारी पथकाने धाड मारत रेतीने भरलेले तीन आणि रेती भरण्याचे उद्देशाने उभा असलेला एक असे चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेतली असता सदर ट्रॅक्टर मारोडा येथील सचिन गुरनूले, विकास चौधरी, बाळु मंडलवार आणि श्रीकोंडावार यांच्या मालकीचे असल्याचे समजले. भरारी पथकाने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात आणले असून नियमानुसार कारवाई करण्यांत येत आहे. ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर पैकी दोन ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नसुन बांधकाम पुर्ण करण्यासाठी अनेकांना रेतीची आवश्यकता असल्याची संधी साधुन तालुक्यातील अनेक मंडळी रेतीचा अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. हे विशेष

रेतीचा अवैद्य उपसा करतांना तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले, महसुल विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईने रेती व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये