Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेमध्येच बनवावे

वीर अशोक सम्राट संघटनेच्या वतीने निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले असून,वर्धा शहरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर ग्रामीण भागात साटोळा इथे जिल्हाधिकारी व वैद्यकीय शिक्षण अधिकारी आरोग्य विभाग अधिकारी यांनी जागेचे निरीक्षण केले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचं निर्णय घेतला वर्धा जिल्ह्य़ातील राजकीय पक्ष चे नेत्यांनी वर्धा शहरात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधू दिले नाही वर्धा जिल्ह्याचे निवडून आलेले खासदार रामदासजी तडस व आमदार पंकज भोयर यांनी लोकसभेत व विधानसभेत आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडले नाही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील भाजपचे आमदार समीर कुनावार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट इथे बनविण्याची मागणी केली नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात विधानसभे बाहेर बसून असलेले आमदारांनी हातात पोस्टर पकडून हिंगणघाट मध्ये वैद्यकीय महाविद्यालय बनविण्याच्या निर्णय घेतला नाही तर मी समीर कुणावार आपल्या आमदारकीच्या पदावरून राजीनामा देईल असे हिंगणघाट तालुक्याचे भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी धमकी दिली याच दबावाखाली महाराष्ट्राचे असलेले भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी विधानसभेच्या अधिवेशनात निर्णय घेताना सांगितले. वर्धा शहरात आधीच दोन वैद्यकीय महाविद्यालये आहेत, त्यामुळे वर्धेत प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट या तालुक्यात वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात येत आहे व भाजपाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना माहित असूनही वर्धेतील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालय खाजगी आहे तरीही यांनी चुकीच्या निर्णय घेतला व वर्धेत प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट इथे बनविण्याच्या निर्णय घेतला व प्रस्ताव पास केला उपमुख्यमंत्री साहेबांनी वर्धा जिल्ह्यातले जिल्हाधिकारी यांना आदेश दिले की हिंगणघाटमध्ये लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यासाठी जागा शोधावी, असे आदेश दिले त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे वर्धा जिल्ह्यातील 16 ते 17 लाख लोकांनाही ज्या चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा हव्यात होत्या,

त्या वर्धा जिल्ह्यातील 16 ते 17 लाख लोकांच्या आरोग्याचा हक्क, भाजपचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, भाजपचे वर्धा सेलु क्षेत्राचे आमदार पंकज भोयर, हिंगणघाट तालुक्याचे आमदार समीर कुणावार यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी 16 ते 17 लाख लोकांचे आरोग्य हक्क हिरावून घेतलेले आहेत भारतीय राज्यघटनेनुसार वर्धा जिल्हातील नागरिकांनाप्रति जबाबदारी आणि कर्तव्य या नेत्यांनी पार पाडले नाही आहे. भारत सरकार, प्रती भारतीय राज्यघटनेनुसार व देशातील लोकांप्रती असलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडताना संविधानिक निर्णय व निर्णय जनतेच्या बाजूने घेणे ही त्यांची जबाबदारी व कर्तव्य आहे, त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असंवैधानिक निर्णय घेतले जे अवैध आहे.

भारतीय संविधान अनुसार देशातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे आमची संघटना भारत सरकारला व शासन व प्रशासनाला नम्र विनंती आहे कि भारतीय संविधान अनुसार भारत सरकार व शासन व प्रशासन यांनी आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत सक्षम निर्णय घेऊन वर्धा ईथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरामध्ये वर्धा जिल्ह्यातला मैन शासकीय सामान्य रुग्णालय दवाखाना आहे. त्यालाच लागुन जुनी जिल्हा परिषदेची जागा आहे, आणि ती जागा वापरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनविण्याच्या निर्णय घेण्यात यावे हि नम्र विनंती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये