Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उप विभाग हिंगणघाट पथक तर्फे पो. स्टे. वडनेर परिसरात प्रो. रेड

फोर व्हीलर सह देशी दारूचा एकूण 12 लाख 37 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 09/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उपविभाग हिंगणघाट पथक तर्फे पो. स्टे. वडनेर परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन गोपणीय माहिती प्राप्त झाली की, आरोपी 1) संगतसिंग जुनी, रा. वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा, (पसार) हा त्याच्या ताब्यातील विटारा ब्रेझा कार मध्ये आरोपी 2) फोर व्हीलर MH 27 BV 7328 चा चालक, (पसार) याचे मदतीने देशी दारू ची अवैधरित्या बिना पास परवाना वाहतूक करीत असल्याचे खात्रीशीर माहिती वरुन नाकाबंदी करून प्रो. रेड केले असता आरोपी 1) संगतसिंग जुनी, रा. वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा, (पसार) व 2) फोर व्हीलर MH 27 BV 7328 चा चालक, (पसार) हे त्यांची ताब्यातील चार चाकी वाहन हे जागीच सोडून मौक्यावरुन पसार झाले.

आरोपी 1) संगतसिंग जुनी, रा. वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा, (पसार) व 2) फोर व्हीलर MH 27 BV 7328 चा चालक, (पसार) चा शोध घेतला असता मिळुन आले नाही. मौक्यावरून देशी दारू व चार चाकी मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कार सह एकूण जू किंमत 12,37,450/- रू चा मुद्देमाल मिळून आल्याने दोन्ही आरोपी विरुद्ध पो. स्टे. वडनेर येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

     सदरची कारवाई माननीय श्री नूरूल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, माननीय श्री सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शन व निर्देशनाप्रमाणे, पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, मनीष कांबळे, सर्व नेमणूक – स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये