ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैद्य दारुविक्रीचा सुरु झाला धडाका

जुनेच दारुविक्रेते सक्रिय ; दारुची दुकाने दाणोदाण ब्रम्हपुरी, मुडझा येथून पाथरी परिसरात दारुचा पुरवठा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राज्यात सतांतरानंतर चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. त्यामुळे लपुन छपुन आणि छूप्या मार्गाने दारू विक्री आणि दारू पिण्याची खटखट मोकडी झाली म्हणून तळीरामानी दारूबंदी हटल्याचे उत्साहात स्वागत केले,आजच्या घडीला जिल्हात सर्वत्र दारू विक्री केली जात असताना,ग्रामिण भागात जुन्याच दारू विक्रेत्यानी दारू बंदी हटल्याची सुवर्ण संधि पाहून अवैध दारू विक्रीचा सपाटा सुरु केल्याचे वृत्त आहे, त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधान येत आहे.ज्या ठिकाणी परवाने आहेत अशाच नाही तर ग्रामीण भागातील कान्याकोपऱ्यात दारू विक्री केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र अश्या गंभीर बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

    पाथरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेली अनेक गावे हि जंगल व्याप्त असल्याची सुवर्ण संधि पाहुन या भागातील जुन्याच दारू विक्रेत्यानी सदर परिसरात अवैध दारू विक्रीचा सपाटा सुरु केला असल्याची चर्चा आहे तालुक्यातील पाथरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मगरमेंढा,सायखेड़ा,जनकापुर, उसरपारचक,तुकुम,निफन्द्रा, निमगांव,पालेबारसा, चकमोशी,करोली,आकापुर, चिखली,डोंगरगांव आदि गावात दारुचीअवैध विक्री केली जात आहे,विशेष म्हणजे ब्रम्हपुरी, मुडझा येथून दारुची वाहतूक होत असून पाथरी परिसरातील अनेक भागात दारुचा पुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे.

याच भागातुन पुरवठा होणारी दारू लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात पुरविली जात असल्याचे विश्वसनीय वृत आहे त्यामुळे जुन्याच दारू विक्रेत्यानी सर्हास दारू विक्रीचा सपाटा सुरु केल्याचे वृत आहे ,जुनेच दारू विक्रेत्यानी नजिकच्या परवाना धारकाकड़ून दारू घेऊन पाथरी परिसरात किरकोळ अवैध दारू पुरवठा करतअसल्याची चर्चाआहे, एवढेच नाही तर अश्या जंगलव्याप्त डोंगरगाव व निफंद्रा परिसरातील दारू विक्रेते वैनगंगा नदी मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूचा पुरवठा करीत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

त्यामुळे अश्या जंगलव्याप्त भागातुन गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारुचि मोठ्या प्रमानात तस्करी होताना दिसते अनेकदा या भागातील नागरिकांनी चिखली – डोंगरगाव या परिसरातिल सुरु असलेली अवैध दारू विक्री बंद केली जावी या बाबत नागरिकांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा मात्र नागरिकांच्या गंभीर समस्याकडे कुणी लक्ष वेधलेले नाही परिणामी या भागात अवैध दारू विक्रीला उधान येत आहे अश्या गंभीर बाबीचि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पाथरी परिसरात सुरु असलेल्या अवैद्य दारू विक्रिवर आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिक जोर धरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये