ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी, विदेशी दारू किंमत 1 लाख 1 हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश. नागदेवे

          दिनांक 04/05/2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, जुनापाणी चौक येथे राहणारी हसीना रोशन शेख ही तिच्या घरी अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा साठा बाळगून त्याची विक्री करीत आहे. अशा माहितीवरून तीचेवर दारूबंदी प्रो. रेड केला असता आरोपी नामे हसीना रोशन शेख वय 43 वर्ष रा. जुनापाणी चौक एरीकेशन कॉलनी पिंपरी मेघे, वर्धा हिच्या ताब्यातून देशी विदेशी दारू असा एकूण 1,01,300/- रुपये चा माल जप्त केला, सदर देशी-विदेशी दारू चा माल मोनू विश्वकर्मा रा. समता नगर वर्धा यांनी त्यांचे कार क्रमांक एम.एच 48 ए.सि 9279 ने आणून दिल्याचे सांगितल्याने दोन्हीही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

       सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी पोलीस अंमलदार हमीद शेख, श्रीकांत खडसे,सचिन इंगोले, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, प्रदीप वाघ अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा* यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये