ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिराच्या लग्नाच्या दिवशीच वाहिनीने घेतले विष 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

घरी दिराचे लग्न असताना झालेल्या घरगुती वादातून वहिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचांदूर येथे घडली.

सुशीला रामकृष्ण सोयाम (30 वर्षे) मूळ गाव बोरी नवेगाव असे मृतक महिलेचे नाव असून यापूर्वी ती आपल्या माहेरी घुघूस येथे पतीसह राहत होती. तिला 12 वर्षीय मुलगा व आठ वर्षांची मुलगी आहे.

प्राप्त माहिती नुसार, कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील सोयाम परिवाराचा विवाह समारंभ 28 एप्रिल रोजी होता. जवळील चनई येथे वरात जाणार होती. सकाळी वरातीची तयारी सुरू असताना वराची सुवासिन होण्यासाठी वहिनी सुशीला हिने हट्ट केल्याने वादविवाद झाला. यात सकाळी साडेआठ वाजता रागाने ती गडचांदूर येथील आपल्या खोलीवर एकटीच निघून गेली व तिथे विष घेतले. याबद्दल कुटुंबियांना कळले असता प्रथम गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वनंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला.

मृतक महिलेची बहीणही गडचांदूरला राहत असल्याने दोन्ही मुले तिथेच होती. घटनेची नोंद गडचांदूर पोलिसांनी घेतली असून पोस्टमार्टमनंतर बोरी नवेगाव येथे पतिच्या मूळ गावी अंत्यविधी करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये