ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटविले ग्रामपंचायतीतील दस्तावेज

पेटविले की पेटविण्यास सांगितले गावात चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी : ग्रामपंचायत बंद असताना कुलूप तोडून अज्ञाताने प्रवेश केला. लोखंडी आलमारीतील दस्तावेज बाहेर काढून पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना तालुक्यातील पारडगाव येथे दि. १५ ला रात्रीच्या सुमारास घडली. याबाबद पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

     ब्रम्हपुरी मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारडगाव ग्रामपंचायत मध्ये समोरील दारातून प्रवेश करुन विविध आलमारीत ठेवलेले दस्तावेज कोणतीही तोडफोड न करता बाहेर काढून जमिनीवर ठेवून पेट्रोल टाकून अज्ञाताने रात्री पेटवून दिल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सदर प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. सदर प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे घडविण्यात आला असा प्रश्न निर्माण होत आहे.

घटना घडल्यानंतर समोरील दाराला कुलूप आढळून आला नाही. तर लोखंडी आलमाऱ्या कुलूपबंद राहत नव्हत्या. त्यामुळे ग्राम पंचायातीशी संबंधित व्यक्तीने हा प्रकार केला असावा असा संशय आहे. पोलिसांनी डॉग स्कॉट तसेच फॉरेन्सिक चमूला पाचारण केले होते. त्यामुळे तपासानंतर सत्य व अज्ञात आरोपी पकडला जाईल काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये