Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठ्ठल मंदिर प्रभागात अंडरग्राउंड नाली बांधकामाचे भूमीपूजन

माजी नगरसेविका संगीताताई खांडेकर यांच्या हस्ते

चांदा ब्लास्ट

शहर महानगरपालिका क्षेत्रातील विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथे दि. ११/०८/२०२४ रविवारला सांय. ५.०० वाजता विठ्ठल मंदिर प्रभागातील मारपीट चौक येथे महानगराच्या नगोध्दन या निधीमधून २५ लक्ष रूपये अथक प्रयत्नाने मंजूर करून अंडरग्राउंड नालीचे भूमीपूजन माजी नगरसेविका संगीता खांडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणारे आहे.

 अंडरग्राउंड नाली हनुमान चौक चनकापुरे यांच्या घरापासून मारपीट चौक, भाग्यलक्ष्मी किराणा पर्यंत तर शांताराम गर्मेलवार ते मोडकवार ते नागापूरे यांच्या घरापर्यंत अंडरग्राउंड नाली बांधकाम करण्यात येणार आहे. तरी होणाऱ्या भुमीपुजन कार्यक्रमाकरिता प्रभागातील सर्व नागरिकांनी सायं. ५ वाजता उपस्थित राहावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये