ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रणरणत्या ऊन्हाची पर्यटनालाही झळ., शहरातील पर्यटनस्थळे सामसुम

गजबजलेली पर्यटनस्थळे पर्यटकांविना पडलेली ओस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

एतेहासीक पर्यटन नगरी असलेल्या भद्रावती शहरातील पर्यटनस्थळे रणरणत्या ऊन्हामुळे प्रभावीत झाली असुन शहरातील एरवी गजबजलेली पर्यटनस्थळे पर्यटकांविना ओस पडलेली आहे. रणरणत्या ऊन्हाची झळ या पर्यटनाला चांगलीच बसली आहे.भद्रावती शहरात हिंदू, बौद्ध व जैन धर्मांचा सुरेख संगम आढळून येतो. हिंदुंचे सुप्रसिद्ध भद्रनाग मंदीर, गवराळ्याचा वरदविनायक, भवानी मंदीर,चंडीका मंदीर, बौध्द बांधवांची विंजासन येथील ऐतिहासिक बुध्द लेणी तर जैन बांधवांचे देशातील प्रख्यात असे प्राचीन जैनमंदीर असल्याने शहरात वर्षभर पर्यटकांचा ओघ असतो.

जवळच्या परीसरातील नागरीकांसाठी भद्रावती हे विक एंड साठी स्वस्त आणी जवळचे ठिकाण असल्यामुळे शहरात विशेषतः हिवाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्याचप्रमाने प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेशमंदीर परीसराला जत्रेचे स्वरुप येते. या पर्यटनातून शहरातील व्यावसायिकांना त्याचा लाभ होतो मात्र एप्रील महिण्याच्या ऊन्हाच्या तडाख्यामुळे पर्यटकांनी शहराकडे पाठ फिरविल्याने येथील व्यवसायालाही मंदी आली आहे. राज्य शासनातर्फे भद्रावती शहराला पर्यटन नगरी म्हणून घोषीत केले आहे.

स्थानीक प्रशासनातर्फेही शहरातील पर्यटनस्थळ परिसरांना विकसीत करुन सुंदर व आकर्षीत बनविले आहे. गणेश मंदीर परीसर, बुध्द लेणी परीसराचा विकास करुन त्यांना आकर्षक केल्यामुळे शहरात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र रणरणत्या ऊन्हामुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांविना ओस पडलेली आहे. हि स्थिती आणखी तीन महिने अशीच राहणार असल्याने पर्यटनावर अवलंबून असलेले येथील व्यवसाय सध्या तरी ठप्प झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये