ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तब्बल २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारला भरला घोडपेठचा आठवडी बाजार

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खंडित झाली आठवडी बाजाराची परंपरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   तालुक्यातील नागपूर चंद्रपूर महामार्गावरील घोडपेठ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. मात्र ही प्रत्येक आठवड्याची परंपरा यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खंडित झाली असून यंदाचा आठवडी बाजार पहिल्यांदाच शुक्रवारच्या ऐवजी रविवारी भरविण्यात आला.

घोडपेठ हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. आजूबाजूला 15 ते 20 खेडे असून बरेचसे शेतकरी कुटुंब आहेत. परिसरात वेकोली उर्जाग्राम तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील कर्मचारी मोठ्या संख्येने राहतात. आजूबाजूच्या गावातील ताजा भाजीपाला घोडपेठ येथील बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घोडपेठ येथील आठवडी बाजारात येतात. महामार्गावरचे गाव असल्याने तसेच आठवडी बाजार महामार्गालगतच भरत असल्याने इतर प्रवासी सुद्धा घोडपेठ येथील आठवडी बाजारातून वस्तू खरेदी करणे पसंत करतात.

घोडपेठ तसेच परिसरातील नागरिकांना बाजाराच्या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत तर्फे प्रयत्न करण्यात आले होते. त्यानुसार १९९७ पासून दर शुक्रवारी घोडपेठ येथील आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून कोरोनाचा अपवाद वगळता दर शुक्रवारी नियमितपणे आठवडी बाजार भरत होता. मात्र यावेळी लोकसभा निवडणूक ही शुक्रवारी आल्याने २७ वर्षात पहिल्यांदाच आठवडी बाजार रविवारी भरविण्यात आला. याची माहिती बऱ्याचशा व्यापारी व ग्राहकांना नसल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी कमी दिसून आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये