ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टाकळी येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

197 रुग्णांनी घेतला लाभ : आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             तालुक्यातील टाकळी येथील समाज भावनात दिनांक 25 रोज गुरुवारला सकाळी दहा वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, जनसेवा ग्रामीण विकास आणि शिक्षण संस्था तथा ग्रामपंचायत टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ टाकळी तथा परिसरातील 197 गावकऱ्यांनी घेतला.

यावेळी टाकळी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रवीण बांदुरकर, जनसेवा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक दीपलता नन्नावरे, संतोष पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरात मेडिसिन, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग व बालरोग आदी रोगांचे निदान करून त्यावर उपचार करण्यात आले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली व त्यांच्यावर उपचार केले.

सदर शिबिराला यशस्वी करण्यासाठी वामन खाडे, नथू डोळस, विशाल परचाके आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये