ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विहीरगाव जि.प.शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

  आज दि.23/04/2024 रोज मंगळवारला जि. प. प्राथमिक शाळा विहीरगाव केंद्र -गेवरा पं. स. सावली येथे शाळापूर्व तयारी मेळावा -1 चे आयोजन करण्यात आले. इयत्ता 1 लीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष वर्गात शाळेत येण्यापूर्वी तयारी व्हावी, शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, निपुण भारत उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य व्हावे म्हणून शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केला.

या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. कुसमाकरजी वाकडे अध्यक्ष शा. व्य. स. लाभले होते. तसेच मार्गदर्शक म्हणून कल्पना गराटे प्राचार्य विकास ज्यु. कॉलेज विहीरगाव लाभले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हेमंतकुमार ढोक सरपंच ग्रा. प. विहीरगाव, भारतीताई काळबांधे उपसरपंच, छायाताई भरडकर उपाध्यक्ष शा. व्य. स. आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस,1 ल्या वर्गात दाखल होणारे पाल्य व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

सात स्टॉल नुसार दाखल पात्र विद्यार्थ्यांची क्षमता खेळीमेळीच्या वातावरणात स्वयंसेवकाच्या साह्याने तपासण्यात आल्या. कार्यक्रमाचा शेवट गोड जेवणाने करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये