ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकी शाळेत भरला शाळा पूर्वतयारी मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दिनांक 25 एप्रिल 2024 ला प्रवेश पात्र विध्यार्थ्यांचा शाळा पूर्व तयारी मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकी येथे आयोजित करण्यात आला होता.

जून महिन्यात शाळा सूरू होण्यापूर्वी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, भाषिक, गणितीय क्षमता विकसित करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्या जाते.यात दोन मेळावे घेतल्या जातात त्यात हा पाहिला शाळा पूर्वतयारी मेळावा खडकी शाळेत घेण्यात आला. रीतसर मेळाव्याचे उदघाटन सौ सोनू ताई मेश्राम सदस्य शाळा व्य. समिती खडकी यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले.

या मेळाव्याला श्री प्रभाकर वेरकडे सदस्य शा. व्य. स., सुनंदा मेश्राम, अर्चना पेंदोर, पोलीस पाटील श्री संकटराव गेडाम, गावातील प्रतिष्ठित नागरिक बापूजी किन्नाके, अंगणवाडी सेविका सौ अनिता रेगुंडावार उपस्थित होते. या मेळाव्यात सहा दाखल पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शाळेत विविध उपक्रम नेहमी घेण्यात येतात.

शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री तुमराम सर यांनी उत्तम पद्धतीने केले कार्यक्रमाचे संचालन श्री समरीतकर सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये