ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि सीबीएसइ वणी येथे पदवी (ग्रॅड्युएशन) दिवस साजरा

चांदा ब्लास्ट

मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि येथील स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी पदवी दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सोमय्या ग्रुपचे उपअध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,प्राचार्य अश्विनी ढोले,उपस्थित होते.

           कार्यक्रमप्रसंगी केजी २ प्राथमिक विभागात पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आयुष्यातील पहिली पदवी घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता.

          यावेळी विविध सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात छोट्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. रंगबिरंगी पोशाख परिधान करून या चिमुकल्यांनी नृत्य व इतर कलांचे प्रभावीपणे सादरीकरण केले.

           या संगीतमय कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमानंतर पदवीदान सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. मॉन्टेसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पदवीधर वेशभूषा करून पदवीचा स्वीकार केला. या वेळी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्त्व या विषयावर नृत्य सादर केले.चिमुकल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले त्यामध्ये प्रथम ओम पारखी,ओम लांबट,अनुश्री कळसकर,शिवेनश बोर्डे,धनश्री जुमडे ,आदित्य चिंताकुत्तलवार,आदर्श पांडे,स्वरांशी वनकर,पृथ्वीक खांडरे,पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देउन गौरविण्यात आले.

        या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन पल्लवी पाटील मॅडम आणि रोशनी अन्सारी मॅडम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये