ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर., झाडे कोसळण्याच्या घटना

मनपा प्रशासनास कळताच तातडीने कोसळलेली झाडे हटविण्याची मोहीम

चांदा ब्लास्ट

शहरात काल दि.२२ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सदर घटनेची माहिती मनपा प्रशासनास कळताच तातडीने कोसळलेली झाडे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून अधिकांश परिसर रहदारीस मोकळा करण्यात आला आहे.

काल वादळात शहरातील तुकूम, बंगाली कॅम्प,रयतवारी कॉलोनी, हवेली गार्डन छत्रपती नगर,वडगाव,सरकार नगर इत्यादी परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या.सुदैवाने यात जीवित हानी अथवा कुणी जखमी होण्याची घटना घडली नाही. अनेक जागी झाडे पडल्याने रहदारीस अडथळा होईल हे लक्षात घेता मनपा अग्निशमन विभाग,उद्यान विभाग व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे सदर झाडे हटविण्याची मोहीम रात्रीच हाती घेण्यात आली.

शहराच्या विविध भागातील १५ ते १६ कोसळलेली झाडे हटवुन रात्रीच रस्ता मोकळा करण्यात आला तर उर्वरीत ठिकाणची झाडे हटविण्याचे काम सुरु आहे. काल आलेल्या वादळात वाहणारे वारे हे अत्याधिक गतीने वाहत होते तसेच पावसाचाही जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी नागरीकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये