ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांची कारवाई

एकूण 11,45,540 रु. चा मुद्देमाल जप्त ; 58 आरोपीतांवर गुन्हे नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

1.पोलीस स्टेशन सावंगी मेघे फसवणुकीचा गुन्हा नोंद

दिनांक 01/04/2024 रोजी यातील फिर्यादी डॉ. रश्मी नरेंद्र साखरवाडे हिला मो.न. 27606832031 या व्हॉटसअप नबरं वरून Jessy Meera From KICK STARTER MEDIA Company Ltd या कपंनीने पार्ट टाईम जॉब संबधाने माहिती देवुन Telegram ग्रुप जॉईन करायला सांगितला.

संबधित Telegram xzqioj @ sanjana 3145 महिलेने फिर्यादीस सोनाली मोहांती या टयुटरशी ची लिंक जॉईन करायला सांगितले. संबधित ग्रुपमध्ये फिर्यादीला वेळोवेळी पैशाची मागणी google pay@phone pay व्दारे करण्यात आली त्या बदल्यात तुम्हाला बोनस मिळेल अशी बतावणी दिनांक 03/04/2024पर्यंत एकूण 88000 रू. ची मागणी करून UPI संबधीत फसवणुक केली. अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन पो. स्टे. सावंगी मेघे येथे अप. क. 301/2024 कलम 419, 420 भादवी सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

2.पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे – अपघाताचा गुन्हा नोंद

दिनांक 13/04/2024 चे 12/00ते 12.15 वा दरम्यान यातील फिर्यादी शा.तर्फे पो.हवा. /541 आनंद भस्मे पो.स्टे. सिंदी रेल्वे यांना फोनव्दारे मिळालेल्या माहिती अन्वये नागपुर ते जाम रोडवर विवान पेट्रोल पंप दरम्यान अपघात झालेला असुन एक इसम रस्त्यावर पडुन आहे. घटनास्थळी जाउन पाहणी केली असता होंडा अँमेजकार क्र. एम.एच. 47 एन. 2638 ही उभी असुन गाडीचा चालक/आरोपी मनिष रमेश मरकाम यास अपघाताबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याचे ताब्यातील कारने डब्लु.सी.एल. चे 02 अधिकारी घेवुन नागपुर वरून बल्लारशा येथे जात असतांना अचानक एक पुरूष इसम वय अंदाजे 45 ते 50 वर्षा चा रोडक्रॉस करून गाडी समोर आला.

त्यामुळे त्याला कारची धडक लागली. तिथे हजर असलेले प्रत्यक्षदरर्शी साक्षदार नामे आरिफ सरदार खॉ पठाण रा. बरबडी यांनी सांगीतले की, जखमी इसम हा नेहमी याच रोडने याच परिसरात फिरत राहतो. त्याचे डोक्यात फरक असुन त्याचे नाव व पत्ता कोणालाही माहीत नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांचे बयाणावरून आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन सदर इसमाला धडक मारून जखमी केले. फिर्यादीचे तकारी अन्वये पो. स्टे. सिंदी रेल्वे येथे अप. क. 108/2024 कलम 279, 337 भा.दं.वि. सहकलम 184 मो.वा.का अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

3. पोलीस स्टेशन गिरड वाळु चोरीचा गुन्हा नोंद –

दि 13/04/2024 चे 11.30 वा ते 13/04/2024 वा. चे 12.15 वा दरम्यान यातील फिर्यादी सफौ पंचम कोड गिरवार पोलीस स्टेशन गिरड यांना मौजा वाशी ते नंदुरी रोड वाशी गावाचे कनल जवळ आरोपी चालक मंगेश पुंडलीक बोबडे वय 29 वर्ष रा आष्टी चंदनखेडा ता. भद्रावती जि. चन्द्रपुर ह.मु. वाशी ता. समुद्रपुर जि. वर्धा आरोपी क्रमांक 2) ट्रॅक्टर मालक नीखील बंडजी राउत वय 23 वर्ष ता. समुद्रपुर जि. वर्धा हे दोन्ही आरोपी त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बिना पास परवाना शासनाचा महसूल चुकून रेतीची चोरी करून ट्रॅक्टर मालकाच्या सांगण्यावरून घेऊन जाताना मिळाल्याने त्यांचे ताब्यातुन जु.कि 8,08,300 रू चा माल जप्त करून सदर दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गिरड येथे अप. क. 64 / 2024 कलम 379,34 भा.द.वि. सह कलम / 181, 3(1), 50(2)/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

4. पोलीस स्टेशन समुद्रपूर – आकस्मिक मृत्युची नोंद

यातील फिर्यादी सुरज अर्जुन बावणे रा.सेवा यांचे मोठे वडिल भिमरावजी बावणे यांचे घरी कंदुरिचा कार्यक्रम असल्याने जेवणाचा कार्यक्रम सुरु होता मृतक पियुष विठ्ठल बावणे वय 17 वर्ष हा अंगणात बसुन होता तेव्हा पियुस यास भिमराव बावणे यांनी आपले घरी पाहुणे आले असल्याने तु बाहेर काय करित आहे आत मध्ये येऊन पाहुण्याला जेवण वाढ असे म्हटले असता मृतक पियुष याला राग आला व त्याने रागाचे भरात अंगणाचे बाजुला असलेल्या सरकारी विहरिचे पाण्यात उडी मारली म्हणुन लगेच पाहुण्यांनी व लोकांनी विहरित पाहिले असता पियुष दिसुन आला नाही म्हणुन लोखंडी गळ टाकुन पाहिले असता पियुष मृत अवस्थेत गळाला लागुन आला.

मृतक पियुष विठ्ठल बावमे रा.सेवा याने विहिरिचे पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो. स्टे. समुद्रपूर येथे 20/2024 कलम 174 जाफौ. अन्वये आकस्मिक मृत्युची नोंद करुन तपासात घेतला.

5. वर्धा जिल्हा पोलीसांची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई

दिनांक 13.04.24 रोजी मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील 19 पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये मोहिम राबवुन जिल्हयात अवैधरित्या दारु विकी तसेच वाहतुक करणाऱ्यांवर एकुण 50 केसेस करुन 11,45,540 /- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण 58 आरोपीतांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे.

वरिल मोहिम एकत्रीत रित्या वर्धा जिल्हा पोलीसांतर्फे राबविण्यात आलेली असुन यापुढेही प्रभाविपणे कारवाई करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये