ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाने केली ग्रामस्थची शिकार 

शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- बल्लारपूर येथील जवळच असलेल्या बामणी बेघर येथील अमितनगर येथे राहणाऱ्या दिवाकर मनोहर उमाटे (57)हा ग्रामस्थ नेहमी प्रमाणे गावातील जवळच असलेल्या नाल्यावर मच्छी पकडण्या करिता जात असतांना दबा धरून बसलेला ढोऱ्या वाघाने झपाट्याने शिकार करून मयत दिवाकर ला फरफकट घेवून जंगलात नेले आणि त्याला वाघाने भक्षण केले.

शनिवार चा दुपारी सुमारास मृतक गावाजवळच नाल्यावर मच्छी पकडण्या करिता घरून गेला होता सायकाळ झाले तरीही तो घरी नं आल्याने घरच्यांनी सगळी कडे शोधा शोध केली तरीही तो दिसून न आल्याने रविवार सायंकाळी 5 चा सुमारास माहिती मिळाली की मृताकाची चप्पल व कुऱ्हाड नाल्या जवळ आहे तेथे ग्रामीण ग्रामस्थ गेले असता मृतकाचे सामान व वाघाचे पंजाचे निशाण दिसून आले आज सोमवार रोजी सकाळ पासूनच शोध घेतला असता जंगल चा आत छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतक दिवाकर उमाटेचा शव दिसून आला तात्काळ वनविभाग व पोलिसांना कळविण्यात आले पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदना करिता पाठविण्यात आले. पुढील तपास वन विभाग व पोलीस करीत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये