ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी येथे आरोग्य व अस्थिरोग तपासणी शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

सहिशनु फोऊँडेशन तर्फे २३ डिसेंबरला भेदे कॉम्प्लेक्स नागभिड रोड ब्रम्हपुरी येथे यांच्या अस्थिरोग, पाठीचा मनका तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला. ५३ रुग्नापैकी 5 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. आणि 4 रुग्णांना epidualr ingection साठी निवड करण्यात आली.

फेरतपासणी तसेच नवीन रुग्णांना अस्थि व पाठीचा रुग्णांना तपासायचे असेल तर दिनांक २९ डिसेंबरला सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्येत येण्याचे आवाहन केलेले आहे. शिबिरामध्ये उमेश पत्रे, डॉ. उमाकांत राउत मेडिकल ऑफिसर, डॉ. प्रणय कोडाप फिजिओथेरेपिस्ट, प्रियंका मेश्राम, अक्षय हजारे, लंकेश्वर सेलोकर, शिवानी रडके यांनी सहभाग दर्शविला. डॉ. अमित भांडारकर यांनी त्यांचे वडील स्वर्गवासी डॉ. वासुदेवराव भांडारकर माजी प्राचार्य ने.ही महाविद्याय यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन समाज कार्याच्या वारसा जोपासला आणि भविष्यात असे उपक्रम प्रत्येक महिन्याला होत राहतील अशी शास्वती डॉ.अमित भांडारकर यांनी जनतेला दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये