ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅक्टर पलटून एकाचा मृत्यू एक घायल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- येथील दादाभाई नौरोजी वॉर्ड येथील डॉ. पुरी दवाखाना जवळच ट्रॅक्टर, दत्त मंदिरचा उतार भागातून येत असतांना रस्त्याचा मोडीवर वळण घेताना ट्रॅक्टर पलटी झाली त्यात दोघे बसलेले होते त्यातून ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरचा मुंडा पलटी झाल्याने चालक दबून जाग्यावरच मरण पावला आणि बाजूला बसलेला कामगार ट्रॅक्टर वरून खाली बाजूला पडल्याने त्याला जबर मार लागल्याने त्याला दवाखान्यात रेफर केले.

मृतकाचे नाव पतीराम कोरे रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड (55)घायाळ प्रेमसिंग चंदेल (60)ची प्रकृती नाजूक असल्याने त्याला दवाखान्यात दाखल केले. ट्रॅक्टर डेंगर नावाचा मालकाची समजते ट्रॅक्टरला नंबर नाही ट्राली वर MH-34-AB-2362 नं. आहे असे सांगण्यात येते की ट्रॅक्टर दोन वाजेपर्यंत नगर परिषद येथे कचरा उचलण्याचे काम करीत असते नंतर दुसरे काम करतात. ट्रॅक्टर उतार भागातून वळण घेत असतांना ट्रॅक्टर पलटी झाली आणि त्यात चालक दबून मरण पावला व कामगार जखमी झाला.

वेळेवर पोलीस निरीक्षक आपल्या पोलीस कर्मचारी सह दाखल झाल्याने क्रेनचा मदतीने दबलेला मृतक ला काढण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये