ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिमेंट उद्योगातील ठेकेदारी कामगारांना प्रत्येकी २५००० रूपये ते ३०००० रूपये एरिअर्स मिळणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

चंद्रपूर जिल्ह‌यातील अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, ए.सी.सी सिमेंट, दालमिया सिमेंट, व मानिकगड सिमेंट या कंपन्या मध्ये ठेकेदारी पध्दतीने काम करणा-या ५००० ते ६००० ठेकेदारी कामगांराची वेतन वाढ व इतर मागण्या संदर्भात नागपूर येथे डेप्यूटी चिफ लेबर कमिश्नर ( सेंन्ट्रल) यांच्या कडे युनियन व व्यवस्थापन यांच्यात औद्योगिक विवाद (industrial dispute) सुरू आहे. अखेर व्यवस्थापन व युनियनच्या पदाधिकारी यांच्या मध्ये आपसी चर्चा होवून शेवटी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत कारखान्यातील सर्व अकुशल ठेकेदारी कामगारांना प्रति दिवस ९५/- रूपये, अर्धकुशल कामगारांना प्रति दिवस १००/- रूपये व कुशल कामगारांना प्रति दिवस 105/- रूपये आमच्या युनियनच्या माध्यमातुन वाढ देण्यास मंजुरी दिली. त्याप्रमाणे कामगारांना सरासरी २६००/- रूपये प्रतिमाहा प्रत्यक्ष वाढ मिळणार आहे. कंपनीवर पडणारा बोझा लक्ष्यात घेता ही अप्रत्यक्ष वाढ प्रति दिवस 115रू ते ११८ रू पर्यंत जाणार आहे.

उपरोक्त व्यवस्थापना पैकि अंबुजा सिमेंट व ए.सी.सी सिमेंट व्यवस्थापना सोबत झालेल्या चर्चा नुसार (MOU) करण्यात आला. त्यानुसार ठेकेदारी कामगारांना स्थायी करणे व इतर मागण्याबाबत कंपनीच्या वरीष्ठ अधिका-यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले आहे. व वाढीव पगार वाढ व एरिअर्स हे दिनांक १६ एप्रिल २०२४ च्या अगोदर देण्याचे ठरले आहे. परंतु या मध्ये दालमिया उद्योगाच्या अधिका-यांनी सहकार्य न केल्यामुळे तेथील कामगारांची पगार वाढ प्रलंबीत आहे.

परंतू अल्ट्राटेक व्यवस्थापनाने उपरोक्त पगार वाढ मान्य केली पण इतर मागण्याबाबत नकारात्मक धोरण अवलंबल्यामुळे ठेकेदारी कामगांराना स्थायी करण्यात यावे, लोडींगच्या नवीन कामगारांना वेतन फक्त ९५० रूपये देत आहे, ते वेज बोर्ड नुसार 1550 रूपये देण्यात यावे या साठी निर्णय न घेणे तसेच स्थायी व ठेकेदारी कामगारांच्या प्रलंबीत मागण्यानुसार मेडिकल सुविद्या, यूनिफार्म, इन्क्रीमेंन्ट, पदोन्नोती, सेवा निवृत्त कामगारांना पिएफ व पेन्शन ची सुविद्य न देणे या मागण्या युनियनने मागे घ्याव्या यासाठी दबाव तंत्राचा वापर व्यवस्थापनाव्दारे करण्यात आला.

त्याला युनियने नकार दिल्यामुळे करार पत्रावर सहया करण्यास पदाधिका-यांनी नकार दिला. तरी पण व्यवस्थापन एकतर्फी निर्णय घेवून ठेकेदारी कामगारांना उपरोक्त पगार वाढ व एरिअर्स तिन दिवसात देणार आहे. कामगारांच्या इतर मागण्याबाबत त्यात महत्वाची बाब म्हणजे ठेकेदारी कामगारांना स्थायी करणे पूर्वी अल्ट्राटेक सिमेंट मध्ये स्थायी कामगारांची संख्या ९०० च्या वर होती ती आता १३० च्या आत आलेली आहे. ही मुख्य मागणी असल्यामुळे युनियनवर दबाव आणून मागणी पत्र परत घेण्यात यावे व युनियने याला विरोध केल्यामुळे व्यवस्थापनाने पदाधिका-याची सहमती न घेता एकतर्फी निर्णय घेवून मागील एक वर्षाचे वाढीव पगाराचे एरिअर्स ठेकेदारांना दिले असून ते समोरिल दोन तिन दिवसात ही रक्कम ठेकेदारी कामगारांना मिळणार आहे.

परंतू बाकीच्या प्रमुख मागण्यांना व्यवस्थापनाने होकार न दिल्यामुळे युनियन व कामगारांमध्ये असंतोष आहे व करार पत्रावर सहया न करण्याचा युनियनच्या पदाधिका-याचा निर्णय या भूमिकेचे कामगारांनी समर्थन केले आहे.

युनियनचे अध्यक्ष मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकारांने चार ही सिमेंट उद्योगातील ठेकेदारी कामगारांची पगार वाढ शक्य झाली आहे.

                  विनित

साईनाथ बुचे महासचिव शिवचंद काळे कार्याध्यक्ष,एल. अन्ड.टी सिमेंट कामगार संघ, आवारपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये