ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रानटी हत्तींच्या बंदोबस्तासाठी सावली वनपरिक्षेत्राची आगळीवेगळी शक्कल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा शेखर प्यारमवार

सावली : मागील वर्षी ऑक्टोबर/२०२३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून रानटी हत्तीच्या कळपाने वैनगंगा नदीच्या पात्रामधून अचानक चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला. रानटी हत्तीच्या कळपाच्या भ्रमण मार्गात येणाऱ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतपिक जसे धान, कापूस सोयाबीन इत्यादी पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस व नुकसान केली.

मागील फेब्रुवारी महिन्यापासून रानटी हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी तालुक्यातील जंगल क्षेत्राचे वैनगंगा नदी परिसरात ठाण मांडून संचार करीत आहेत आणि त्याच रानटी हत्तीचा कळप वैनगंगा नदी पात्रातून चंद्रपूर जिल्ह्यात येऊन शेतपीक नुकसान तसेच मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सेत पीक नुकसान किंवा मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्र सावली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले श्री विनोद धुर्वे यांनी रानटी हत्तीच्या कडपाचा बंदोबस्त करण्याचे उद्देशाने वैनगंगा नदी पात्रात ज्या ठिकाणाहून हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करू शकतो जसे आकापूर घाट, करोली घाट, गेवरा खुर्द घाट, विहीरगाव घाट या ठिकाणी बांबू काठया, लोखंडी तार व सोलर बॅटरीचे मदतीने कुंपण लावण्यात आले असून उग्र वासाची पेटती मशाल, मधमाशा आवाजाचे स्पीकरद्वारे रानटी हत्तीचा कळप हुसकावून लावण्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे.

वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत नदीपात्राच्या बाजूस येणाऱ्या प्रत्येक गावात हत्ती पासून सावधानता बाळगण्याच्या सूचनेची भित्तिपत्रके, बॅनर लावण्यात आले व ऑडिओ ध्वनिफीतद्वारे नियमित मुनारी देण्यात येत असून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मा. विभागीय वन अधिकारी व मा. सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात एन बी पाटील क्षेत्र सहाय्यक पाथरी, श्रीराम आदे वनरक्षक गेवरा, श्रीमती कल्याणी पाल वनरक्षक खानाबाद, संदीप चुधरी वनरक्षक मेहा व  विनोद वाघरे हे वरील सर्व नदीघाटावर इतर रोजंदारी मजूर व गावकऱ्यांच्या मदतीने दिवस -रात्र कडक पहारा व आप आपल्या नियतक्षेत्रात नियमित गस्त करीत असून रानटी हत्तीच्या बंदोबस्त करिता केलेल्या दैनंदिन कार्यवाहीची नोंद गस्ती रजिस्टरला घेण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये