जातीयवादी वकील राकेश किशोर यांच्यावर देशद्रोह्याचा खटला दाखल करून देशातून हद्दपार करा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भुषण गवई साहेब यांच्यावर न्यायालयात दिनांक ६ आक्टोंबर २०२५ ला हल्ला करणाऱ्या नीच जातीयवादी मानसिकतेच्या राकेश किशोर यांचा तीव्र निषेध करण्यात येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्याला देशातून हद्दपार करण्यात यावे.
अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भारताच्या महामहीम राष्ट्रपती यांना मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत दिनांक ८ आक्टोंबर २०२५ ला एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भुषण गवई साहेब यांच्यावर नीच जातीयवादी मानसिकतेतून दिनांक ६/१०/ २०२५ ला हल्ला करण्यात आला. या कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूर द्वारा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
हा हल्ला केवळ न्यायमूर्ती मा. भुषण गवई साहेब यांच्यावर नसून हा हल्ला संविधानाचे संरक्षण करणाऱ्या न्यायव्यवस्थेवर आहे. या कृत्यामुळे जगात भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन झाली आहे. हा अक्षम्य गुन्हा आहे.
आपण संविधानाच्या संरक्षक आहात. त्यामुळे संविधानाने दिलेल्या संस्थेचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
करीता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूर द्वारा
मागणी करण्यात येत आहे की हे नीच कृत्ये करणाऱ्या जातीयवादी राकेश किशोर यांस कठोर शिक्षा करण्यात येऊन त्याला देशातून हद्दपार करण्यात यावे.
खालीलप्रमाणे मागणी करण्यात येत आहे-
१) सदर माथेफिरू वकिलाची सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी.
२) सदर विकृत वकिलावर देशद्रोह्याचा खटला दाखल करून कठोर शिक्षा देण्यात येऊन त्यांना देशातून हद्दपार करण्यात यावे.
३) सर्वोच्च संवैधानिक पदावरील भारताच्या सरन्यायाधीशाची सुरक्षा वाढविण्यात यावी.
४) कट्टर धर्मांध आणि संविधान न मानणाऱ्या लोकांकरिता कायदा आणखी कठोर करण्यात यावा.
भारतीय लोकशाही आणि संविधानाचे संवैधानिक रक्षण करण्यासाठी नागरिकांच्या उपरोक्त रास्त मागण्या तात्काळ मान्य करून कार्यवाही करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे मोरेश्वर चंदनखेडे जिल्हा अध्यक्ष, नेताजी बुरचुंडे, सिद्धार्थ सुमन नागपूर प्रदेश महासचिव, गोपाळ रायपूरे माजी अध्यक्ष, बाजीराव उंदिरवाडे माजी अध्यक्ष, गुरुदास रामटेके जिल्हा कोषाध्यक्ष, जनार्दन वाघमारे, अशोककुमार उमरे गडचांदूर, ऍड. प्रियांका चव्हाण, भारतभूषण तावाडे, रमेश पाटील, कोमल रामटेके, बाळकृष्ण जीवने, डी.जी. दुर्गे, अनिल खोब्रागडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले.