ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वनरक्षक वनपाल एक दिवसाचे वेतन देणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत.
या संकटात शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील वन विभागातील वनरक्षक वनपाल यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची कारवाई करण्यात यावी अशी विनंती फॉरेस्टर्स आणि फॉरेस्ट गार्ड्स असोसिएशन शाखा बुलढाणा जिल्हा यांनी उप वन संरक्षक बुलढाणा यांना निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे, विनोद मुळे वनपाल वन्यजीव विभाग, कैलास तराळ, उपाध्यक्ष, वनवृत अमरावती, किर्ती खरात, महिला आघाडी उपाध्यक्ष, बुलढाणा, मुंढे साहेब सह सचिव, वनवृत अमरावती उपस्थित होते.