तहसील कार्यालयाच्या आवारात शिवसेनेचे धरणे आंदोलन
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांना घेऊन शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात दिनांक आठ रोज बुधवारला तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये मदत द्या, कंपन्यात स्थानिक बेरोजगारांना काम द्या अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करून नारबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांनी सांगितले.आंदोलनात जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, शहर प्रमुख नंदू पढाल व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.