नमो उद्यान विंजासन-देऊरवाडा रोडवरील भवानी माता मंदिर परिसरात करा
भाजप शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र सरकारने देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक नगर पालिकेला नमो उद्यान निर्मितीसाठी प्रत्येकी एक करोड रुपयांचा निधी दिलेला आहे. सदर उद्यान हे विजासन रोडवरील भवानी मातेच्या मंदिर टेकडी परिसरात करण्यात यावे. तसेच सदर जागा ही महाराष्ट्र शासनाची असून सातबाऱ्यावर सरकार असा उल्लेख असल्याने या ठिकाणी नमो उद्यान करण्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नसल्याने विजासन -देऊरवाडा रोडवरील टेकडी येथील भवानी माता मंदिर परिसरात नमो उद्यान करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी मुख्याधिकारी सौ. विशाखा शेळकी यांना दिले.
हे निवेदन देते वेळी अनिल धानोरकर, प्रशांत डाखरे, इम्रान खान प्रशांत झाडे, माधव बांगडे, निलेश देवईकर, गोपाल गोस्वाडे, विनोद पांढरे सर, भाजप महिला आघाडी अध्यक्ष वृषाली पांढरे, विशाल ठेंगणे, प्रणिता शेंडे, लताताई भोयर, रेखाताई राजूरकर अनंता मांढरे, श्रीपाद भाकरे, राकेश खुसपुरे तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.