भद्रावती नगर परिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शहरातील 14 प्रभागातील 29 जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण नगरपरिषद कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.
प्रभाग एक अ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब गट सर्वसाधारण, प्रभाग दोन अ गट अनुसूचित जाती (महिला) ब गट सर्वसाधारण, प्रभाग तीन अ गट अनुसूचित जाती (महिला) ब गट सर्वसाधारण, प्रभाग चार अ गट अनुसूचित जाती ब गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभात पाच अ गट अनुसूचित जाती ब गट सर्वसाधारण (महिला), प्रभाग सहा अ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गट सर्वसाधारण (महिला), प्रभाग सात अ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब गट सर्वसाधारण, प्रभाग आठ अ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गट सर्वसाधारण (महिला) प्रभाग 9 अ गट अनुसूचित जाती ब गट सर्वसाधारण (महिला), प्रभाग 10 अ गट अनुसूचित जमाती (महिला) ब गट सर्वसाधारण, प्रभाग 11 अ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गट सर्वसाधारण (महिला), प्रभाग 12 अ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गट सर्वसाधारण (महिला), प्रभाग तेरा अ गट अनुसूचित जाती (महिला) ब गट सर्वसाधारण, प्रभाग 14 अ गट अनुसूचित जमाती ब गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) क गट सर्वसाधारण (महिला).