ध्यानामुळे आकलन शक्ती वाढते — प्रा. वाकडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आनंदवन योगा व भिशी गृप तर्फे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गृप मधील ३२ कुटुंबांनी सहकुटुंब सहभाग घेतला. संध्याकाळच्या चांदण्यांच्या प्रकाशात योग, ध्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. वाकडे यांनी उपस्थितांना योग, साधना व ध्यानाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “नियमित ध्यान केल्याने मन स्थिर होते, ताणतणाव दूर होतो आणि व्यक्तीची आकलन शक्ती तसेच विचार करण्याची क्षमता वाढते.”
यानंतर सर्व सदस्यांनी मिळून ध्यानसत्र घेतले. त्यानंतर कोजागिरीच्या पारंपरिक चालीरीतीनुसार गरम दुधाचा व जेवणाचा आस्वाद घेतला. हास्यविनोद व अनुभव कथन यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
कार्यक्रमाचे संयोजन योगा गृप प्रमुख रमेश ढवस,राजेंद्र पांडे, बाबाराव वाकडे,सुधाकर धोबे,शरद जोगी,राजीव बावने,सुनिल आसुटकर,गोपाल पिंपळ शेंडे,सुनिल बुरुले,वांढऱे,बंडूभाऊ डाखरे,मुकूंद जोगी,परोधे,रोगे, मेश्राम आणि इतर सदस्यांनी केले.शेवटी प्रा. वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी “मनःशांती आणि आत्मविकासासाठी ध्यानाचा अंगीकार” हा संकल्प घेतला.